logo

राज्य सरकारच्या वतिने अँड. किरण जाधवर यांची उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे साहाय्यक सरकारी वकिल व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली

धाराशिव |भूम
राज्य सरकारच्या वतिने अँड. किरण जाधवर यांची उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे साहाय्यक सरकारी वकिल व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वाशी तालुक्यातील वडजी येथील अँड. किरण जाधवर हे छत्रपती संभाजीनगर येथे २००२ पासून वकिली व्यवसाय करत आहेत. त्यांनी अनेक खाजगी , शासकिय संस्थेवर सल्लागार म्हणून उच्च न्यायालयात उत्कृष्ठ काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल राज्य शासनाने २०१८ मध्ये साहायक शासकीय अभियोक्ता म्हणून निवड केली होती. यानंतर सरकारी वकिल म्हणून चांगली जबाबदारी पार पाडल्याने राज्य सरकारने दि.७ मार्च २०२४ रोजी कार्याची दखल घेऊन अँड. किरण भास्कर जाधवर यांची उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे साहाय्यक सरकारी वकिल व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर फेर नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी सरकारी वकील म्हणून फेर नियुक्त करण्यात आल्याने त्यांचे मित्र परिवार तसेच वकिल मंडळाकडून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

0
0 views